रत्नागिरी:- तालुक्यातील नांदिवडे येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा रामचंद्र भुवड (रा. नांदिवडे, ता. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास नांदीवडे अंबुवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे एका झाडाखाली निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित भुवड हा सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आली. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन नोटीस देण्यात आली आहे.