रत्नागिरी:- जयगड नांदिवडे येथील सिद्धी नरेश वनके या विद्यार्थिनीची राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान मनमाड, नाशिक येथे खेळवली जाणार आहे.
सिद्धी नरेश वनके ही माध्यमिक विद्यामंदिर, जयगड प्रशालेची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण घेताना तिने कबड्डीच्या अनेक स्पर्धांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. शालेय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये तिने चमकदार कामगिरी केली आहे. याच दमदार कामगिरीच्या जोरावर सिद्धी वनके हिची २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान नगर परिषद मैदान मनमाड, नाशिक येथे होणाऱ्या 36 व्या किशोर /किशोरी राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्याच्या अंतिम बारा जणांच्या संघात निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघात तिची निवड होताच भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे यांच्यासह जयगड पंचक्रोशीतील ग्रामस्थानी तिचे विशेष अभिनंदन केले.