पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती
रत्नागिरी:- रत्नागिरीतील नर्सिंगच्या तरुणीवरील लैंगिक अत्याचाराच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. यामध्ये महिला पोलिस निरीक्षकासंह आणखी दोन महिला पोलिस उपनिरीक्षक आणि इतर पोलिस आहेत. पीडित मुलीले दिलेल्या जबाबानुसार तांत्रिक, वैज्ञाणिक असा सर्व अंगाणी याचा तपास सुरू असुन विविध पथके यावर काम करत आहेत. लवकरच तपासात काहीतरी निष्पन्न होईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरीत घडलेल्या या घृणास्पद घटनेंतर प्रचंड जनप्रक्षोभ उसळला. रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने जमाव जिल्हा रुग्णालयात होता. फाशी… द्या फाशी … आरोपीला फाशी द्या म्हणत जमाव जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात घुसण्याचा प्रयत्न करत होता. अनेक वेळा रास्ता रोको करण्यात आलो. मोठ्या प्रमाणाच जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. परंतु अजून त्या नराधमांचा शोध लागलेला नाही.
या लैंगिक अत्याच प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, लैगिंक अत्याचार प्रकरणी पीडिताने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. त्यासाठी एसआयडीची स्थापना केली आहे. पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्यासह अन्य दोन महिला अधिकारी यामध्ये आहेत. तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अन्य पथकेही याचा समांतर तपास करत आहेत. जबाबात पीडित मुलीने जो मार्ग दिला होता. त्या मार्गावरील ४ सीसी टिव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले आहेत. तपासाच्यादृष्टीने मोबाईल रेकॉर्डस अन्य काही मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अतिशय संवेदनशील हा गुन्हा असल्याने सर्व अंगानी आम्ही त्याची चौकशी सुरू ठेवली आहे.
तांत्रिक आणि वैज्ञाणिकदृष्ट्याही तपासण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. सर्व अंगाने या गुन्ह्याचा तपास सुरू असून वेगवेगळी पथकं यासाठी नेमण्यात आली आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने काही संशयितांना
चौकशीसठी ताब्यात घेतले आहे, असेही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.