नरेंद्र जोशी दिसतील तिथे फटकावू; बिपिन बंदरकर यांचा इशारा

रत्नागिरी:-‘उद्योगमंत्री ना.उदय सामंत आमचे दैवत आहेत. त्याच्या बद्दल अक्षेपार्ह बोलणाऱ्या नरेंद्र ऊर्फ अप्पण जोशी यांच्यावर पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा नरेंद्र अप्पण जोशी यांना भेटेल तेथे फटकवू असा इशारा मंत्री सामंत समर्थक बिपिन बंदरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी  रोशन फळके, विकास पाटील आदी उपस्थित होते.

बारसू रिफायनरी विरोधी सभेत बोलताना नरेंद्र जोशी यांनी मंत्री ना.उदय सामंत यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ना.सामंत समर्थक आक्रमक झाले आहेत.
यावेळी बिपिन बंदरकर यांनी जोशी यांना थेट इशारा दिला आहे. पोलीसांनी तात्काळ कारवाई करावी. आम्ही हे खपवून घेणार नाही. जोशींना दिसेल तिथे फटकवू असा इशारा दिला आहे.