धावत्या ट्रकचा विद्युतवाहीनीला स्पर्श.. मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी:- लांजा देवधे येथे गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा विद्युत वहिनीला स्पर्श झाला आणि ट्रकमधील गवताने पेट घेतला. बघता बघता ट्रकमधील गवत जळून खाक झाले. चालकाने गाडीतून उडी मारत स्वतःचा जीव वाचवला. 

गवत भरून ट्रक निघाला होता. ट्रकच्या टबपर्यंत गवत भरण्यात आले होते. यावेळी महावितरणच्या तारेला स्पर्श झाल्याने ट्रकमधील गवताने पेट घेतला. बघता बघता ट्रकला देखील आग लागली. चालकाने गाडी थांबवत गाडीतून उडी मारली. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत ट्रेकच मोठे नुकसान झाले.