संगमेश्वर:- मुंबई- गोवा महामार्गावर धामणी येथील ड्राईव इन हॉटेलसमोर दुचाकी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार नितीन अनंत मेस्त्री (वय 45 धामणी सुतारवाडी) हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून (एम एच -14- 1461) संगमेश्वर धामणी कडे जात होता. पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना त्याची धडक समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोला नंबर ( एमएच -08 एपी- 1781 ) बसली. हा अपघात इतका गंभीर होता की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. यावेळी नरेंद्रचार्य महाराज संस्थानची ॲम्बुलन्स बोलवण्यात आली. त्यावेळी चालक गुरुप्रसाद नागवेकर व त्याचा मित्र सौरभ फटकरे व काशिनाथ फेफडे यांनी नितीनला त्वरित हॉस्पिटलला नेले. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.