रत्नागिरी:- धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने २ महिने तुरुंगवास आणि २ लाख २४ हजाराची नुकसान भरपाई तसेच भरपाई न दिल्यास आणखी पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावली आहे.
प्रथमेश प्रकाश चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१९ ला घडली होती. प्रथमेश हा आर्थिक अडचणीत असताना, त्याने फिर्यादी स्वरा प्रशांत डोर्लेकर यांच्याकडून उसनी रक्कम घेतली होती. ती परत करण्यास अनेक दिवस टोलवा टोलवी करत होता. शेवटी रक्कम परत करण्यासाठी, वारंवार फिर्यादिनी तगादा लावल्यावर प्रथमेश यांनी, फिर्यादी डोर्लेकर यांना उसन्या घेतलेल्या रक्कमेचा धनादेश दिला. परंतु, आरोपीच्या खात्यात, पैसे नसल्यामुळे, तो धनादेश वटला नाही म्हणून अॅड. मंदार भावे यांचे
मार्फत, फिर्यादी यांनी रत्नागिरी फौजदारी कोर्टात, फौजदारी केस दाखल केली होती. ही केसचा सुनावणी रत्नागिरी चौथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रॉड्रिंक्स यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी प्रथमेश चव्हाण याला धनादेश अनादर प्रकरणी २ महिने तुरुंगवास व २ लाख २४ हजार फिर्यादी यांना नुकसान भरपाई व भरपाई न दिल्यास आणखीन १५ दिवसांची
शिक्षा ठोठावली.