धनंजय कुलकर्णी जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक

रत्नागिरी:– रखडलेल्या पोलीस बदलांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांना अद्यापही नवीन नियुक्ती देण्यात आलेली नाही.आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या दुसऱ्या यादीत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे चिपळूणचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तसेच रत्नागिरीचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या बॅचमधील आहेत.

      राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी गृह विभागाच्या वतीने काढण्यात आले. आस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती रत्नागिरी पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. गेले दोन वर्ष रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोहित कुमार गर्ग यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेले नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या दुसऱ्या यादीत यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.