मनसेच्या मागणीला यश
रत्नागिरी:- रत्नागिरी धामणसे-नेवरे ते मालगुंड व गणपतीपुळे आरेवारे रत्नागिरी या एसटी बस फेऱ्या कोरोना काळापासून दोन वर्षे बंद होत्या. त्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली होती. अखेर मनसेच्या या मागणीला यश आले असून एसटी प्रशासनाने या दोन्ही बससेवा पूर्ववत सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे .दरम्यान, मनसेने एसटी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
तालुक्यातील रत्नागिरी धामणसे-नेवरे ते मालगुंड व गणपतीपुळे आरेवारे रत्नागिरी या एसटी बस फेऱ्या कोरोना काळापासून दोन वर्षे बंद होत्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना १३ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदन देण्यात आले . यावेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी या बस फेऱ्या लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते.
दरम्यान,निवेदन दिल्यानंतर रुपेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बस फेऱ्या सुरू करण्याबाबतचा पाठपुरावा चालूच ठेवला होता.अखेर मनसे च्या या मागणीला यश आले असून ,एसटी प्रशासनाने या बस फेऱ्या पूर्ववत सुरू केल्या आहेत.
ही बस दररोज संध्याकाळी वरवडे मधून ६:१० मि. रत्नागिरी साठी रवाना होते. मालगुंड – गणपतीपुळे – नेवरे – धामणसे – जाकादेवी – निवळी – हातखंबा करून रेल्वस्थानका जवळुन रत्नागिरी बस स्थानकात जाते, ही बस रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन ला जाण्यास खुप उपयुक्त आहे .या मार्गावरील सर्व प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रुपेश जाधव यांनी केले आहे.
मनसेने एस टी प्रशासनाचे देखील आभार मानले आहे. बस सेवा पूर्ववत सुरु होण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विभागअध्यक्ष संकेत गवाणकर , सचिन सांडीम, सौरभ पाटील , अखिल शाहू , सोम पिलणकर, सौ. आकांक्षा पाचकुडे, आशिर्वाद सुर्वे, अभिपेक गवणकर आदी मनसे पदाधिककाऱ्यानी विशेष मेहनत घेतली.