दोन लाखाच्या कर्जासाठी गमावले सव्वालाख; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बिर्ला फायनान्स कंपनीकडून दोन लाखांचे कर्ज मिळवण्यासाठी 1 लाख 25 हजार 460 रुपये गमावण्याची वेळ कुवारबाव येथील तरुणावर आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने शहर पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. 

छगन मनोहर कुंभार ( वय 34, कुवारबाव) या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. 10 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. फसवणूक केल्या प्रकरणी रितेश दीनानाथ पांडे आणि संजीव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

आरोपी रितेश व संजीव यांनी फिर्यादी यांना वेळोवेळी फोन करुन आदित्य बिर्ला फायनान्स मुंबई कंपनी कडुन 2 लाखाचे वैयक्तित अर्ज देतो असे सांगुन असे पत्र देवुन फिर्यादी यांना दि .१०/ ११/ २०२० रोजी ते आजपर्यंत पैसे भरण्यास सांगुन एकुण १,२५,४६०/- रु.भरलेली रक्कम फिर्यादी यांना परत न करता त्यांची फसवणुक केलेली आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.