रत्नागिरी:- पावस ते रत्नागिरी रस्त्यावरील फणसोप हायस्कूल समोरील स्पिड ब्रेकरवर दोन मोटारीमध्ये धडक झाली. या अपघातातील संशयित मोटार चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सतीश सुर्यवंशी (वय २६) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फणसोप हायस्कूल समोरील रस्त्यावरील स्पीड ब्रेकर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार प्रेम रजनीकांत पवार हे मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ९८३०) घेऊन रत्नागिरी ते पावस असे प्रवासी घेऊन जात असताना फणसोप हायस्कूल येथे आले असताना पाठीमागून येणाऱी मोटार (क्र. एमएच-१४ डी एन ३११४) वरील संशयित चालक अक्षय सुर्यवंशी याने धडक दिली. या अपघातात दोन्ही मोटारीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.