दोन डॉक्टर्ससह तालुक्यात 16 नवे रुग्ण

रत्नागिरी:- गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात 16 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात नव्याने दोन डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाली असून सन्मित्र नगर येथे 3 तर थिबा पॅलेस आणि कुवारबाव परिसरात पुन्हा रुग्ण सापडला आहे. 
 

तालुक्यात डॉक्टर्सना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दररोज वाढत आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात नव्याने 2 डॉक्टर्स पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय सन्मित्र नगर येथे 3, निवळी 1, कुवारबाव 1, थिबा पॅलेस 1, नाचणे गोडाऊन 1, कर्ला 1, पावस 1, मांजरे 1, जयगड 1, राधाकृष्ण टॉकीज रोड 1, करबुडे 1, चिपळूण आणि पालघर येथील ऍडमिट प्रत्येकी 1 तर कोकण नगर येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण मयत झाला आहे.