संगमेश्वर:- देवरुख – आंबव रत्नागिरी मार्गावर वायंगणे येथे पल्सर दुचाकीचा अपघात झाला होता या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना 28 एप्रिल रोजी घडली होती. अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय सिताराम साळवी (23, देवरुख मधलीवाडी, संगमेश्वर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय साळवी हा आपल्या ताब्यातील पल्सर मोटरसायकल घेउन देवरुख आंबव ते रत्नागिरी असा चालला होता. यावेळी वायंगणे येथे आल्यावर वळणाचा अंदाज न आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला.या अपघातात पल्सर रस्त्याच्या डाव्या बाजूला गटारावर आदळली. यामध्ये अक्षय याच्या डोक्याला गंभीर दुखापत होउन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अक्षय याच्यावर स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात भादविकलम 304 (अ), 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.