देवरुख:- देवरुख येथे तीन पत्ती जुगार खेळताना पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी (ता. १५) सायंकाळी साडेसात च्या सुमारास निदर्शनास आली. देवरुख येथील कुंभ्याचा दंड येथे एका पडक्या घराच्यापाठी काही जण पत्ते खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तिथे धाड टाकली. संतोष बाबू कदम (४७, रा. देवरुख), प्रकाश सीताराम बंडागळे (५५, रा.मुरादपूर), मनोहर रघुनाथ चाळके (६५, कर्ली -देवरुख), विठ्ठल शिवाजी देवकर (४८, रा. पाटगाव) हे संशयित तीन पत्ती खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून साहित्यासह ७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरुख पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.