रत्नागिरी:- देवदर्शनासाठी नांदेडहून रत्नागिरीत आलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
चक्रधर अशोक भोसले (36, रा.मंडाळा उमरी जि.नांदेड) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत त्याच्या मित्राने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, हे दोघेही देवदर्शनासाठी नांदेडहून निघून मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वा.पूणे स्वारगेटला पोहचले. त्यानंतर ते स्वारगेटहून रत्नागिरीत बुधवारी सकाळी 6 वा.पोहचले. एसटी स्टँडवर उतरले असता चक्रधर भोसलेची तब्बेत बिघडली त्यामुळे याचा मित्र साहेबराव याने त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. चक्रधरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.