खेड:- तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी-मंडणगड फाटा येथील एका जमीन मालकालाच जमिनीत बांधकाम करण्यास अडचण निर्माण करून भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सीताराम शिर्के (वय ३७, रा. चिंचघर-दस्तुरी, खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ही अतिक्रमणाची घटना २ ते १५ जानेवारी या कालावधीत घडली.
याबाबतची फिर्याद महंमद हुसेन अब्दुल्ला परकार (६८, रा. साखरोळी खुर्द, खेड) यांनी येथील पोलिस ठाण्यात २४ मे रोजी दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत चिंचघर-दस्तुरी-मंडणगड फाटा येथील व चिंचघर महसुली हद्दीतील फिर्यादी महंमद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीच्या जमिनीत नितीन सीताराम शिर्के यांनी संमतीशिवाय प्रवेश केला तसेच त्यामध्ये पत्र्याची शेड उभी करून’ भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. तसेच फिर्यादी परकार यांना त्यांच्या मालकीच्या जमिनीत बांधकाम करण्यास’ अडचण निर्माण केली. याबाबत झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.