रत्नागिरी:- कुवारबांव सिंचन भवन बसस्टॉप येथे दुचाकी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. संशयिताविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश बाबल्या झोरे (२८, रा. नुतननगर, नाचणे, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास सिंचन भवन एसटी स्टॉप रस्त्यावर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह कुवारबांव गेटसमोरील रस्त्यावर घडली. जखमी प्रमोद चंद्रकांत चव्हाण (४२, रा. जुवे, रत्नागिरी) हे प्रवासी रिक्षा (क्र. एमएच. ०८ एक्यू ०६२१) घेवून हातखंबा ते रत्नागिरी असे जात होते. त्यावेळी समोरून येणारी दुचाकीची (क्र. एम.एच ०८ एएस ८६५०) प्रवासी रिक्षाला धडक बसली. अपघातात प्रमोद चव्हाण, महिला पोलीस शिपाई अंजली सुदाम सहारे २२, सुनंदा मोहन डोंभरे २३, स्वार महेश झोरे, मृणाल गोरे असे पाचजण जखमी झाले.