गुन्हा शाखेच्या दोन कारवाया ;चौघाच्या टोळीचा समावेश
रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीमधील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करून त्याने दिलेल्या कबुलीतून अनेक दुचाकी, घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत. यामध्ये चौघांचे टोळके असून त्यांनी सात ठिकाणी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या सराईताची चांगलीच दहशत होती. घर फोडीतील अन्य दोघांनाही गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेने दोन्ही मोठ्या कारवाया केल्या आहेत.
गुन्हे अन्वेषण शाखेला गोपनीय सुत्रधारांकडुन माहिती मिळाली. त्याआधाआरे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा व त्यांचे पथकाने ही कारवाई केली. चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी रोहिदास बाळू पवार हा खेड रेल्व स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खेड रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचुन संशयित रोहिदास बाळु पवार (वय २५, रा. पिंपळी खुर्द, ता. चिपळूण, ) याला दुचाकीसह ताब्यात घेतले. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याचा साथीदार दीपक रंगनाथ लिल्हारे, अजय राजेश चौधरी ( दोघे रा. खेर्डी, दत्तवाडी, ता. चिपळुण, जि. रत्नागिरी) यांच्या मदतीने लोटे, आवाशी येथुन चोरल्याचे निष्पन्न झाले. तिघा संशयितांना खेड पोलिस ठाण्याच ताब्यात देण्यात आले. त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
रोहिदास पवार याने त्याचा साथीदार सागर कातुर्डे ( रा. शिवाजीनगर, खेर्डी, ता.चिपळुण) याने दिलेल्या माहितीवरुन त्याचा साथीदार दीपक रंगलाल लिव्हारे व बालक यांच्या मदतीने चिपळूण पिंपळखुर्द येथील एका बंद घर फोडले. दरवाजाचे कुलुप तोडुन घरातील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे सांगितले. या प्रकरणी वरील चौघांना ताब्यात घेण्यात आले. लोटे येथील विनती कंपनीचे आवारातील गोडावुनमध्ये ठेवलेल्या इलेक्ट्रीकल अॅल्युमिनीयम केबल, पुश बटण स्टेशन व एस.एस. एलबो पाईप, असे २२ हजाराचे किंमतीचे साहित्य चोरीस गेले होते. हा गुन्हा देखील उघड झाला आहे. ४९१३५ रुपये किंमतीचा मुद्देमाल राजकुल उस्मान शेख (वय २१ वर्षे, रा. धीरया,जि.भीरभुम, रा.प.बंगाल), तासीरुद्दिन अमीर शेख (वय ३१ वर्षे, रा. कुकरा, जि.भीरभुम, रा.प.बंगाल), या संशयितांकडुन जप्त करण्यात आला. खेड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. ही कारवाई संदीप वांगणेकर, प्रशांत बोरकर, संजय कांबळे, सुभाषभागणे, मिलींद कदम, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अरुण चाळके, सागर साळवी, चापोना. दत्तात्रय कांबळे यांनी केली.