रत्नागिरी:- तालुक्यातील कोळीसरे फाटा ते गडनरळ जाणार्या रस्त्यावर दुचाकी चालकाचा ताबा सुटल्यामुळे ती गटारात पडून अपघात झाला.अपघाताची ही घटना शनिवार 6 मार्च रोजी रात्री 8.10 वा.सुमारास घडली.यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून चालकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदिप गंगाराम कोलगे (36,रा.गडनरळ,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.शनिवारी रात्री प्रदिप कोलगे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एयु-2448) वरुन अमोल वसंत चौगुले याला सोबत घेउन कोळीसरे ते गडनरळ असा जात होता.तो जांगल देवाचे मंदिराच्या अलीकडे आला असता त्याचा दुचाकीवरचा ताबा सूटल आणि दुचाकी गटारात पडून अपघात झाला.यात प्रदिप आणि अमोल हे दोघेही जखमी झाले असून दुचाकीचे नुकसान झाले आहे.