रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून पुढील दुचाकीला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताची ही घटना सोमवार 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.15 वा.सुमारास जिल्हा परिषद कमानीसमोर घडली.
चित्राक्ष विनायक भाटकर (19,रा.खांबवाडी नाखरे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालकाचे नाव आहे.या अपघातात शकील अब्दुल अजीज मजगावकर (51) आणि त्यांची पत्नी परवीन शकील मजगावर (45,रा.उद्यमनगर,रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.सोमवारी दुपारी शकील मजगावकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एबी-5530) वरुन पत्नी परवीन यांना घेउन जिल्हा परिषद कमानीसमोर उजव्या बाजुला वळवत होते.त्याचवेळी चित्राक्ष भाटकर आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08- एएम-3139) वरुन त्यांच्या पाठीमागून येत असताना त्याने मजगावकर यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत अपघात केला.या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले असून अधिक तपास पोलिस नाईक वीर करत आहेत.