रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे फाटा येथे दुचाकीवरिल ताबा सुटून दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फाईकअल्ली इब्राहिम डावे (वय ६२, रा. फणसवणे, ता. संगमेश्वर) व इनायत अहमद
गैवी (वय ५८, रा. लांबेवाडी-फणसवणे, ता. संगेश्वर) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास करबुडे फाटा रस्त्यावर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इनायत गैवी हे दुचाकीवरुन सोबत वृद्ध फाईक डावे यांना घेऊन मंगळवारी संगमेश्वर ते रत्नागिरी असे उक्षी मार्गे येत असताना अकरा वाजता करबुडे रस्त्यावर आले असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.