दुचाकीला अपघात; पशुधन पर्यवेक्षकाचा मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डेनजीक अज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या सहायक पशुधन पर्यवेक्षक यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ३१ रोजी सांयकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

दीपक केशव गमरे (वय ५४, रा.चिपळूण) असे मृत सहायक पशुधन पर्यवेक्षक यांचे नाव आहे. ३१ रोजी आपले काम आटपून दुचाकीने मुंबई- गोवा महामार्गावरून आपल्या घरी परत जात असताना जांबूर्डेनजीक एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर  त्यांना १०८ रूग्णवाहिकेने नजीकच्या घरडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.