दुकान फोडणार्‍या टोळीतील तिघांना न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- शहरातील आवठडा बाजार येथील यश ट्रेडर्स हे दुकान फोडून रोख 32 हजार रुपये  लांबवणार्‍या तीन संशयितांना मंगळवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.सोमवारी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

फिरोज इसरार आलम (48, रा.उत्तरप्रदेश), मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास (27, रा.कानपूर उत्तरप्रदेश), मोहम्मद अझरुद्दीन मेहम्मद हनीफ (22, रा.कासीमनगर उत्तरप्रदेश) अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांनी  निर्मल रमेश ओसवाल (33,रा.आठवडा बाजार,रत्नागिरी) यांच्या आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून गल्ल्यातील रोख 32 हजार रुपये चोरुन नेले होते. शहर पोलिसांच्या पथकाने  गोवा येथील कळंगुटमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कमही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते.सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात  आली.