दारूच्या रागातून पत्नीला लादी पुसण्याच्या मॉबने मारहाण

रत्नागिरी:- दारु का पिता असे विचारल्याच्या रागातून पत्नीला लादी पुसण्याच्या मॉबने मारहाण केली. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. सुमारास एस.टी.कॉलनी येथे घडली.

किशोर शांताराम पांचाळ (50,रा.एस.टी.कॉलनी माळनाका,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी किशोर पांचाळ हा घरी दारु पित असल्याचे पाहून तिने तुम्ही दारु कशाला पिता असे विचारले. याचा राग आल्याने पती किशोरने तिला घरातील लादी पूसण्याच्या मॉबच्या स्टिकने कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली.