दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; संशयित वकिलाचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- जाकादेवी येथे दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणातील संशयित वकिलाचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला.

विनयभंगाची ही घटना २१ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वा. सुमारास घडली होती. रवींद्र केशव लेंडे (३१, रा. पावर हाउस जवळ, चाफे, रत्नागिरी) असे अटकपूर्व जामीन अर्ज नाकारण्यात आलेल्या संशयित वकिलाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.