दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून कोयतीने वार

कुवारबाव येथील घटना ; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मित्रावर कोयतीने सपासप वार केले. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्या असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) ही घटना सोमवारी (ता. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुवारबाव येथील प्रसाद बार समोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सोमवारी प्रसाद बारमधून मद्य प्राशन करुन बाहेर येत असताना संशयित पप्या त्यांच्या समोर आला. त्याने फिर्यादीकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा फिर्यादी यांनी तुला रोजरोज कोठून पैसे आणून देऊ आज माझ्याकडे पैसे नाहीत. तसेच तुझ्या बापाने माझ्याकडे पैसे देउन ठेवलेले नाहीत असे पप्याला सांगितले. त्याचा राग मनात धरुन संशयित पप्याने बाजुच्या मनी लॉटरीच्या दुकानातून कोयता आणून फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर
दुसरा वार फिर्यादीने हाताने अडवल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.