दापोली:- दापोली नगरपंचायत निवडणुक एकत्र लढवलेल्या शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश मिळाले आहे. १७ पैकी १४ ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादीने बाजी मारत नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीने ८ तर शिवसेनेने ६ जागावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने नगरपंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे या निकालावरुन दिसून आले. तर, भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्यात.
पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला. तर माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे.