दापोलीत सराईत गुन्हेगाराकडून मित्राचा खून

दापोली:- दापोली तालुक्यातील कोळथरे येथे सराईत गुहेगार मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. विशाल शशिकांत मयेकर (39) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयीत शशीभूषण सनकुळकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आहे. मात्र संशयीत आरोपी हा अद्याप पोलीसांना मिळाला नसून त्याचा कसून शोध घेत आहेत. कोळथरे सारख्या सुसंस्कृत गावात अशी घटना घडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पंचनदी गावा नजीक कोळथळे हा गाव समुद्रकिनारी वसला आहे. येथे हिंदू व मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ किरकोळ वाद वगळता मोठ्या प्रमाणात एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. मात्र या खुनाच्या प्रकाराने सम्पूर्ण पंचक्रोशी हादरून गेली आहे.

दाभोळ सागरी पोलीसांनी दिलेल्या व घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार विशाल शशिकांत मयेकर हा त्याचा मित्र शशिभूषण शांताराम सनसुळकर रा. कोळथरे, मनोज प्रभाकर आरेकर यांच्यासोबत नेहमी मोलमजुरी करण्याकरीता जात असे. त्यांची चांगली मैत्री देखील होती. त्यांचे नेहमी एकत्र काम व एकत्र बसणे उठणे असायचे. तसेच ते नेहमी एकत्र बसून सोबत दारू देखील पीत असत. शशिभूषण शांताराम सनकुळकर हा कोणत्या ना कोणत्यातरी कारणावरून होत असलेल्या वादातूनच दारूच्या नशेत एकमेकांना धक्काबुक्की करून मारहाण करीत असे. 18 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या पूर्वी कोळथरे मोहल्ला येथे मित्र शशिभूषण सनकुळकर याने शुल्लक कारणावरून विशाल मयेकर रा. पंचनदी, निमुर्डेवाडी याला कोणत्यातरी अवजड वस्तुने अथवा हत्याराने मारले. त्यामध्ये अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होवून तो मयत झाला. घडलेल्या या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ माजली.

या घटनेची विशाल मयेकर याचा भाऊ व रिक्षा चालक अमित मयेकर यांनी दाभोळ सागरी पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दाभोळ सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.