दापोलीत शुल्लक कारणावरून महिलेला मारहाण

दापोली:- दापोली तालुक्यामधील खरवते बौद्धवाडी येथे क्षुल्लक कारणावरून महिलेला मारहाण केल्याची घटना २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी माधवी साळवी यांचा मुलगा राज हा घरातील भांडी अस्ताव्यस्त टाकून त्यांच्याच शेजारी राहणारे मिलिंद जाधव यांच्या घरी गेला होता. त्यावरून त्यांच्या मुलाला त्या बडबडत होत्या. साळवी या आपल्यालाच बडबडत आहेत व शिवीगाळ करीत असल्याचा समज शेजारी राहणारे मिलिंद जाधव, त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी यांचा झाला. यातून २ एप्रिल रोजी मिलिंद जाधवनी माधवी साळवी, चंद्रकांत साळवी, राज साळवी, श्याम जाधव या सर्वांना आपल्या घरी बोलावून घेतले व तू कोणाला शिव्या देत होतीस, अशी विचारणा करीत त्याने माधवी साळवींना हाताच्या बुक्क्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. “मिलिंद जाधव याची पत्नी, मुलगा व मुलगी यांनीही काठीने साळवींना हाता-पायावर मारहाण करून दुखापत केली. माधवी साळवींच्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.