दापोली:- दापोली येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता अमोल मनोहर विंचूरकर यांनी ठेकेदाराकडे पक्षकाराकडे बसविण्यात येणाऱ्या ११० केव्हीए विजभार व विजरोहित्र या कामाच्या एस्टीमेटला मंजुरी देवून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील ५० हजारांची रक्कम ठेकेदाराकडून घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभियंता अमोल विंचूरकर यांना आज दुपारी सापळा रचून पकडले.