दापोलीत भरदिवसा घरफोडी, 1 लाखाचे दागिने लंपास

दापोली:-दापोली तालुक्यातील आसूद आदर्शवाडी येथे भरदिवस घरफोडी करुन 1 लाख 6 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्यास घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार 25 मे रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सुजाता मस्कर (53, आसुद आदर्शवाडी, दापोली) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्कर या घरी नसताना अज्ञाताने त्यांच्या घराची स्लायडिंग खिडकी फोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुममधील लाकडी कपाटात पत्र्याच्या पेटीत ठेवलेले 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 45 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, 1500 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1 लाख 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

मस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.