दापोलीत दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक; दोघे गंभीर

दापोली:- दापोली शहरानजिक स्मशानभूमीजवळ दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. बुधवारी झालेल्या या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

रुपेश गावडे आणि अनिकेत म्हसकर अशी या जखमी दुचाकीस्वारांची नावे आहेत. अपघातानंतर त्यांना प्रथम दापोलीतील सरगुरोह हॉस्पिटल येथे आणण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर निकेत म्हसकर याला रत्नागिरी येथे, तर रुपेश गावडे याला केईएम मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.