दापोलीत घराचा दरवाजा फोडून अडीच लाखांची चोरी

दापोली:- दापोली तालुक्यामधील बुरोंडी बाजारपेठेत घराचा दरवाजा फोडून सुमारे २ लाख ६२ हजारांची चोरी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.४५ ते सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

दापोली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना शिरगावकर या आपले घर बंद करून कामासाठी बाहेर गेल्या होत्या. जाताना त्यांनी आपल्या घराची चावी घराच्या दर्शनी भागातच असणाऱ्या इलेक्ट्रीक बोर्डवर ठेवली होती. २ मे रोजी अज्ञाताने या चावीच्या मदतीतून घराचा दर्शनी दरवाजा उघडला व लाकडी कपाटातील कपड्यांमध्ये शोधाशोध केली. त्या ठिकाणी लॉकर उघडून प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या १२००० रुपये किंमतीच्या कानातील सोन्याच्या कुड्यांचा जोड व चेन, १ लाख २७ हजार रुपयांचे तीनपदरी गंठण, ६६ हजार रुपयांची सोन्याची २ तोळे २०० ग्रॅम वजनाची चेन, ९ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन, २४ हजार रुपये किंमतीचे कानातील झुमके, ६ हजार रुपये किंमतीची लहान मुलाची अंगठी, ९ हजार रुपये किंमतीची अंगठी, ९५०० रोख रक्कम असा सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. दापोली पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक पड्याळ करीत आहेत.