दागिने हातोहात लांबवणाऱ्या गँगच्या दोघांना अटक

खेड:- रस्त्याने जाणाऱ्यांना अडवून, त्यांना बोलण्यात गुंतवून तसेच विविध बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या कुख्यात बोलबच्चन गँगच्या दोघांना बेड्या ठोकण्यास ठाणे पोलिसांना यश आले आहे.

अनिल कृष्णा शेट्टी (४३) आणि रमेश विजयकुमार जैस्वाल (वय ४७) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना एकट्याला गाठून व त्यांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन अनेक नागरिकांना लुबाडल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून १६ लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. पुढे साड्या वाटप होत आहेत त्यामूळे तुम्हीदेखील कपडे घ्या, पण त्यासाठी तुम्ही गरीब वाटायला हवे म्हणून तुमच्या अंगावरील दागिने काढून आमच्या कडे द्या. अथवा पुढे खून झाला आहे म्हणून पोलीस तपासणी सुरू आहे. त्यामुळे तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा अशा विविध भूलथापा देऊन लोकांना आणि खास करून जेष्ठ नागरिकांना फसवले जाते.