चिपळूण:- तालुक्यातील कोकरे गावात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. निर्जनस्थळी पीडितेवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सोडून पलायन केले होते. पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकरे गावात राहणाऱ्या तरुणांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी आणि पीडित मुलीची ओळख होती. दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर होते. एक आरोपी मुंबईत रहात असून तो मंडप डेकोरेटरचे काम करतो. दोन दिवसांपूर्वी तो गावात आला होता. त्याने पीडितेला फोन करून निर्जन स्थली बोलावून घेतले व तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने एका बंद घराची किल्ली खिडकीतून घेऊन मुलीला घरात नेले व तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणात घर मालकाचा संबंध आहे की नाही, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. बलात्कारनंतर मुली बेशुद्ध पडली. तिला तेथेच टाकून आरोपीने पलायन केले. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून याची तक्रार नोंदवली.