रत्नागिरी:- दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या आरोपावरून मंडणगडमधील सिमाब नसरुद्दीन काझा याला अटक केल्यानंतर त्याचा साथिदार असलेल्या झुल्फिकार बडोदावाला याला अटक करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश आले आहे. बडोदवाला हा मुख्य दोन्ही दहशतवाद्यांच्या संपर्कात राहून सिमाब सोबत हाहि त्यांना आर्थिक मदत करत असल्याचे एटीएसने केलेल्या तपासातून स्पष्ट झाले आहे. त्याला न्यायालयाने दि. ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दहशतवाद्यांना पैसे पाठविणार्या मॅकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सिमाब नसरुद्दीन काझी याला रत्नागिरीतील पणदेरी येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ बडोदावालावर कारवाई करण्यात आली आहे. बडोदावाला हा राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.
बडोदावाला याने महम्मद इमÏान महम्मद युसूफ खान आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी या दोन दहशतवाद्यांना दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले आहेत. त्याने या दोघांशी वेUोवेUी फोनवरून संपर्कदेखील साधला आहे. बडोदावालाला या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली? त्याने नेमकी किती रक्कम दहशतवाद्यांना दिली? या सर्वांचा तपास करण्यासाठी त्याला एटीएस कोठडी देण्यात यावी, हा सरकारी पक्षाचा युक्घितवाद गÏाह्य धरीत सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांनी बडोदावाला याला कोठडी सुनावली आहे.