थिबा पॅलेस येथे तरुणीची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील थिबा पॅलेस येथे तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. तिर्थाली मंगेश जंगम (वय २०, रा. पारस ओशन व्हयू अपार्टमेंट, थिबा पॅलेस, रत्नागिरी ) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ८) दुपारी साडेतीनच्या सुमारास निदर्शनास आली.

या बाबत तिचे वडील मंगेश जंगम यांनी पोलिस ठाण्य़ात खबर दिली आहे. त्यानुसार मंगेश जंगम यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीला पुण्याहून रत्नागिरीला घेऊन आले होते. सोमवारी ते कामावरून काही निमित्ताने घरी गेले असताना त्यांना आपली मुलगी घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी शहर पोलीसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.