खेड:- तालुक्यातील शिव येथे घरावर दरोडा टाकून घर मालकावर जबरी वार करून सोन्या चांदीचे तसेच रोकड घेऊन गेली ३० वर्ष फरारी आरोपीस येथील न्यायालयाने ७ वर्ष सक्त मजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा येथील अति सत्र न्यायालय-१ खेड चे न्यायाधीश श्री.डॉ सुधीर एम. देशपांडे यांनी सुनावली ही चोरीची घटना १३ नोव्हेंबर १९९४ मध्ये घडली होती.
१३ नोव्हेंबर १९९४ खेड पोलीस स्टेशन गु.र.नं. १३९/१९९४, असा गुन्हा एकुण ६ आरोपींवर दाखल करणेत आलेला होता. यातील दोन आरोपी मयत व बाकी आरोपी फरार होते. त्यापैकी जुलै २०२३ मधील मुख्य आरोपी नं. १ शाम बिंद्रावन कैथवास हा पोलीसांना शर्तीचे प्रयत्न करुन सापडला. याकामी खेड येथील सेशन कोर्टात सेशन केस नं. ३२/२०१५ अशी केस दाखल करणेत आलेली होती. सदर आरोपी सापडल्यानंतर त्यास रत्नागिरी कारागृह येथे ठेवून त्याचे विरुध्द तात्काळ असलेल्या दोषारोपांबाबत केस चालविणेत आली. आणि आरोपी हा दोषी आढळून आलेने आरोपी शाम बिंद्रावन कैथवास, रा. सावरगांव ता. जि. वाशिम, यांस श्री.डॉ सुधीर एम. देशपांडे, अति स न्यायालय-१ खेड यांनी भा.द.वि. कलम ३९५ या कलमाखाली ७ वर्ष सश्रम कारावास आणि १ लाख रुपये इतका दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली .
दरम्यान पोलीसांनी तब्बल ३० वर्षानंतर आरोपीस अथक परिश्रमाने पकडून आणून केस संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे जतन करुन आवश्यक साक्षीदार आणि इतर कागदपत्रे कोर्टासमोर आणलेबददल त्यांचे कौतुकार्थ दंडातील रक्कम रुपये २५ हजार ही पोलीस कल्याण निधीला भरण्यासाठी कोर्टाने आदेश केलेला आहे.
आरोपी आरोपी शाम बिंद्रावन कैथवास, याने मौजे शिव ता. खेड, जि. रत्नागिरी येथे १९९४ साली इब्राहिम अहमद परकार रा. शिव यांचे घरी पहाटेचे वेळी आपले साथीदारांसोबत शसस्त्र दरोडा टाकला. आणि इब्राहिम अहमद परकार यांचे डोक्यात वार करुन त्यांचे घरातील सोन्याचे दागदागिने, किंमती घडयाळे आणि रोकड अशी चाकुचा धाक त्यांचे सुनांना आणि इतर घरातील व्यक्तींना दाखवून चोरुन नेले.होते सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण ५ साक्षीदार तपासणेत आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडणेत आला. सदर प्रकरणी इब्राहिम अहमद परकार वय वर्षे – ९२ यांची साक्ष मौलाची ठरली.
सदर प्रकरणी सरकारी वकील अॅड. सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार पो.नि.श्री. पी.एस.सातोसे, तसेच खेड पोलीस स्टेशनच्या कोर्ट पैरवी श्री. चंद्रमुनी ठोके पोकॉ यांचे सहकार्य लाभले.