रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयात कोरोनाने 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 71 झाली आहे.
मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील नाटे गावातील 60 वर्षीय महिला रुग्ण तसेच राजापूर तालुक्यातील पाचल येथील एक महिला रुग्ण आणि राजिवडा, रत्नागिरी येथील एक 60 वर्षीय पुरुष रुग्ण यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
तालुकानिहाय मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. रत्नागिरी 19, खेड 6, गुहागर 2, दापोली 14, चिपळूण 13, संगमेश्वर 7, लांजा 2, राजापूर 7, मंडणगड 1.