रत्नागिरी:- शहरातील रहाटाघर येथील तारादर्शन अपार्टमेंट्याच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ मार्च ते ५ एप्रिल सायंकाळी पाच च्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिजित अशोक खवणेकर (वय ३३, रा. सोहम अपार्टमेंट, शिवाजीनगर-रत्नागिरी. मुळ ः कोल्हापूर) यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय १७३७) ही रहाटाघर बसस्थानकचे मागील बाजूस असलेल्या तारादर्शन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी खवणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.