तहसिलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर (रा. फिनोलेक्स कॉलेज जवळ एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ९ एप्रिल २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तळेकर यांने जिल्हाधिकारी-रत्नागिरी यांच्या ९ एप्रिल २०२४ अपिल अर्जाचे तसेच १३ जानेवारी २०२२ च्या केस क्रमांक निर्वाह अर्जाचे उल्लंघन केले. या प्रकरणी तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी राजाराम म्हात्रे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.