तळेकांटे येथे ट्रक-इर्टिका अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे ट्रक-इर्टिका यांच्यात झालेल्या अपघात 6 जण जखमी झाले होते. या अपघातात इर्टिकाला ठोकून ट्रक दरीत कोसळला होता. सुदैवाने नदीत पडण्यापासून वाचल्याने जिवीतहानी टळली होती. परंतु इर्टिकाला ठोकून ट्रकचालक रात्री फरार झाला होता. या ट्रक चालकाचा संगमेश्वर पोलिसांनी शोध घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्टिका चालक प्रशांत शिंदे नातेवाईकांसह तळेकांटे येथे जात असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकने इर्टिकाला जोरदार धडक दिली. या धडकेत सुरेश रघुनाथ बने, स्नेहा बने, सुहास सावंत, अश्विनी विचारे, अनिकेत विचारे, प्रकाश झोरे असे सहा जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक शाहीद राजा खान (41, उत्तरप्रदेश) हा फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्यावर भादविकलम 279, 337, 338 मोटर वाहन कायदा कलम 184, 134 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.