रत्नागिरी:- लॉकडाऊनमध्ये बंद झालेले बारचे दरवाजे दोन दिवसांपूर्वी उघडले मात्र बार बंद करण्याची वेळ सायंकाळी सहा असल्याने व्यावसायिक आणि मद्यपी नाराज होते. परंतु शनिवारी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाने व्यावसायिक आणि तळीरामांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बार सकाळी 11.30 ते रात्री 10 पर्यंत खुले ठेवण्यास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे.
जिल्ह्यात केवळ बार रात्री 10 पर्यंत खुले राहतील. मात्र बिअर शॉपी, वाइन शॉप आणि देशी बार मात्र यापूर्वीच्या आदेशानुसार सायंकाळी सहा वाजता बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय तळीरामांसाठी दिलासादायक ठरणारा आहे.