“…तर कपलचं खपल चॅलेंज होईल,” सायबर पोलिसांचा इशारा

रत्नागिरी:- सोशल मीडियावर नेहमी काही ना काहीतरी ट्रेंड होत असतं. असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. या ट्रेंडमध्ये प्रेमी युगुल, दांपत्य आपल्या जोडीदारासोबत फोटो शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी फोटो पोस्ट करणाऱ्यांना अलर्ट दिला असून फोटो शेअर न करण्याचं आवाहन करणारं भन्नाट ट्विट केलं आहे.

पुणे पोलिसांनी ट्विट केलं असून फोटो पोस्ट करणाऱ्यांना असं कऱण्याआधी दोन वेळा विचार करा असं सांगत जागरुक राहण्यास सांगितलं आहे. कपलचा खपल चँलेंज होईल असा शब्दांत इशाराही दिला आहे.