तरुणाच्या मृत्यू प्रकरणी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल

खेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत विजेच्या खांबावर फॅब्रिकेशनचे काम करताना खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. संजय चव्हाण असे त्या तरुणाचे नाव असून, या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकावर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत मंगळवारी दुपारी संजय चव्हाण हा तरुण खांबावर चढून फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्यावेळी ट्रेलर (एमएच ४६, एआर ४३७१) येत होता. मात्र, संजय चव्हाण याने त्यांच्या हातातील लाल झेंडा दाखवून ट्रेलर चालकाला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, तो न थांबता पुढे आल्याने ट्रेलरला दोन विद्युत वाहिनीच्या तारा लागून तुटल्या. त्यामुळे विजेच्या खांबांना हिसका बसून खांबावर काम करणारा संजय चव्हाण खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.