तरवळ, पाली येथील दोन तरुणांची आत्महत्या

रत्नागिरी:- तालुक्यातील तरवळ बौध्दवाडी आणि पाली-मराठवाडा येथील दोन तरुणांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोद करण्यात आली आहे. विशाल अशोक पवार (३६,रा. तरवळ बौध्दवाडी, रत्नागिरी) आणि जितेंद्र सुनिल सावंत (३३,रा. पाली मराठवाडा, रत्नागिरी) अशी गळफास घेत आत्महत्या केलेल्या दोन तरुणांची नावे आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी पावणेबारा ते दुपारी दोन या कालवधीत निदर्शनास आली. याबाबत विशालचे वडिल अशोक पवार यांनी तर जितेंद्रच्या चुलत भावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली.

त्यानुसार, मंगळवारी सकाळी अशोक पवार यांचा मुलगा विशालने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या हॉलमध्ये माळ्याच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर जितेंद्र सावंतने अज्ञात कारणातून घराच्या मागील बाजुच्या पडवीमध्ये छताच्या लोखंडी गजाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहांचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.