रत्नागिरी:- तालुक्यातील डोर्ले गणेशमळी येथे किरकोळ कारणातून शेजार्याला दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री 10.30 वा.घडली.
अभय मंगेश हळदणकर, प्रकाश शंकर बिर्जे, संतोष बोरकर, निखिल सुचीत हळदणकर (सर्व रा.गणेशमळी दाभिळ आंबेरे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आललेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात संजय हरिश्चंद्र हळदणकर (42, रा.गणेशमळी दाभिळ आंबेरे,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,संजय हळदणकर हा आपल्याबद्दल आपल्याच आईला काहीतरी सांगून चेतावणी देतो असा गैरसमज अभयने करुन घेत होता.यातूनच अभय हा संजयला वेळोवेळी शिवीगाळ व धमकी देत होता. सोमवारी रात्रीही याच कारणातून चारही संशयितांनी संगनमताने संजय हळदणकर यांना चिव्याच्या दांडक्याने हातांवर आणि पायांवर मारहाण व शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.