जयगड मधील प्रकार; घातपाताचा संशय
रत्नागिरी:- जयगड येथील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात कर्मचाऱ्यांचे जेवण बनवण्यासाठी गेलेली बत्तीस वर्षांची महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेच्या डोक्यात दोन घाव असून हा घातपात असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान महिलेच्या पतीला फोन करून सांगणारा व्यक्ती फरार झाला असून या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदेड येथील बत्तीस वर्षीय महिला जयगड परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जेवण बनवण्याकरता नेहमी त्या ठिकाणी जात असे. सोमवारी दुपारच्या सुमारास ती महिला नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दुपारच्या वेळेस तिथे आपल्या पतीसोबत फोनवरून बोलणे देखील झाले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा त्या महिलेच्या पतीला फोन केला व तुमची पत्नी जखमी होऊन पडळी आहे असे त्या तरुणाने सांगितले. माहिती मिळताच त्या महिलेचा पती घटनास्थळी रवाना झाला. त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात एका खोलीत पडलेली होती. हा प्रकार पाहून पती ते पतीचा थरकाप उडाला. याबाबातची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती महिला पाहून जयगड पोलिसांचा संशय अधिकच बळावला आहे. ज्या व्यक्तीने महिलेच्या पतीला फोन करून माहिती दिली होती ती व्यक्ती आपला मोबाईल स्वीचऑफ करून परिसरातून गायब झाली आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा असा संशय जयगड पोलिसांनी वर्तवला आहे. या महिलेच्या डोक्यामध्ये दोन वार झाले अजून तिची अवस्था गंभीर आहे. तिला तात्काळ रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. बुधवारी दुपारी महिलेची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला अधिक उपचाराकरता जिल्हा शासकीय रुग्णालय हलविण्यात आले आहे. या प्रकाराने जयगड परिसरात खळबळ उडाली आहे. हा नेमका प्रकार काय असा सवाल उपस्थित होत असून महिलेवर हल्ला करण्या मागचे नेमके कारण काय असे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान या मंगळवारी रात्री उशिरा याबाबत जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.