डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अपशब्द काढणाऱ्या तरुणाला अटक

रत्नागिरी:- शहरातील पर्‍याची आळी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत व्हिडिओमध्ये अपशब्द काढणार्‍याला शहर पोलिसांनी अटक केली.ही घटना गुरुवार 4 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 ते 8 वा.कालावधीत घडली आहे.

सुजित सुरेश खडपे (रा.पर्‍याची आळी,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात प्रितम प्रदिप आयरे (39,रा.परटवणे,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,त्यांच्या भिम युवा पँथर तालुका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधील आशिष कांबळे यांनी सुजित खडपेचा हा वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत यावर काही कारवाई होईल का याकडे लक्ष द्या अशाप्रकारची पोस्ट टाकली होती.
ही पोस्ट पाहिल्यावर फिर्यादींनी भिम युवा पँथरच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबत कोणीही उद्रेक होईल असे वर्तन न करण्याचे आवाहन केले. तसेच सर्वांना जिल्हा शासकिय रुग्णालयातसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे येण्याबाबत सांगितले.त्याप्रमाणे बहुसंख्य कार्यकर्ते त्याठिकाणी जमल्यानंतर त्यांनी या व्हिडीओबाबत चर्चा आणि चौकशी केल्यावर त्यांना हा व्हिडिओ शहरातील पर्‍याची आळी येथील असून त्यातील संशयिताचे नाव समजले.त्यावरुन त्यांनी शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.