रत्नागिरी:- रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे याना दुखापत पोहचवणाऱ्या आरोपीची प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदरचा गुन्हा हा जिल्हा शासकीय रत्नागिरी येथील आयसोलेशन वार्ड मधील महिला रूग्ण वॉर्ड 1, सार्वजनिक ठिकाणी ता. जि. रत्नागिरी येथे दिनांक २० मे २०१९ रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्याने घडलेला होता.
सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथील आयसोलेशन वार्ड मधील महिला रूग्ण वॉर्ड एक या सार्वजनिक ठिकाणी यातील फिर्यादी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे राऊंड करीत असताना आरोपी मुन्नेश बळीराम कुवळेकर (रा. चवंडे वठार रत्नागिरी) हा महिला रूग्णांच्या वार्डमध्ये दारू पिऊन मोठमोठ्याने आरडाओरड करून वाद घालत होता. त्यावेळी सदर आरोपीला डॉ. बोल्डे व त्यांच्या सोबतच्या स्टाफने समजावुन सांगुन बाहेर जाण्यास सांगितले असता आरोपी याने डॉ. बोल्डे व इतर स्टाफला मोठ्याने ओरडून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी सदर इसमास डॉ. बोल्डे यानी शांत राहण्यास सांगुन बाहेर जा असे सांगितले असता आरोपीत याने तुम्ही कोण असे बोलून डॉ. बोल्डे याना धक्काबुकल करून डॉ. बोल्डे हे शासकीय काम करत असताना त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या अंगावरील शर्ट फाडुन नुकसान केले. तसेच डॉ. बोल्डे यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला म्हणुन आरोपी याचे विरूध्द दोषारोप पत्र दाखल करणेत आले होते.
सदर आरोपीच्या वतीने अँड. अमित अनंत शिरगांवकर यानी कामकाज पाहिले होते. त्यांचा उलटतपास व युक्तीवाद ग्राहय धरून रत्नागिरी येथील मे. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शेख यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.